संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि झाडांच्या फांद्या पडल्याने मुचरी परिसराला वीजपुरवठा करणारे तब्बल ४० विद्युत खांब कोसळले, तर आठ रोहित्र बंद पडले. परिणामी मौजे तेरे आणि मुचरी येथील विविध वाड्यांमधील सुमारे ५०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवून सलग पाच दिवस अथक मेहनत घेत अखेर वीजपुरवठा सुरळीत केला. या नैसर्गिक आपत्तीमुळे मौजे तेरे येथील टाकेवाडी, कापलेवाडी, दळवीवाडी, भुरवणेवाडी आणि बौद्धवाडी, तसेच मौजे मुचरी येथील मोरवाडी, सुर्वेवाडी, गोरेवाडी, चांदेवाडी, गवळीवाडी यांसह आयडिया टॉवर आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा बंद झाला होता. दिवाळी आणि भाऊबीज या महत्त्वाच्या सणांच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी तातडीने कामाची सूत्रे हाती घेतली. घनदाट जंगल आणि झाडीमधून जाणारी ही वीजवाहिनी तब्बल ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत होती. त्यामुळे कोसळलेले ४० खांब पुन्हा उभारणे, त्यांना ताणे मारणे, वीजवाहिन्या ओढणे आणि मार्गातील अडथळा ठरणारी झाडे साफ करणे, असे मोठे आव्हान महावितरणसमोर होते. संगमेश्वर येथील महावितरणचे ठेकेदार सागर भावे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून लांजा आणि चिपळूण येथील ठेकेदारांची मदत घेत कामाला गती दिली. एकूण चार गँगमधील ४० कामगार आणि महावितरण संगमेश्वरचे १० जनमित्र अशा ५० जणांनी सलग पाच दिवस दिवस-रात्र मेहनत घेतली. स्वतःच्या घरातील दिवाळीचा आनंद बाजूला ठेवून या सर्वांनी ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या कामात महावितरणचे जनमित्र रवी कदम, ओंकार कळंबटे, किशोर लाड, अंकेश गेले, राहुल धनावडे, विश्वनाथ जोशी, विलास भरणकर, अक्षय खानविलकर, किरण मोरे, विनिल काष्टे आणि रमेश कदम यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
मुचरीच्या सरपंच रंजना जाधव तसेच ग्रामस्थ विलास सुर्वे, जगन्नाथ गोरे आणि सुनील जाधव यांनीही सातत्याने सहकार्य केले. वीजवाहिनीच्या मार्गात अडथळा ठरणारी झाडे तोडणे आणि अन्य आवश्यक कामांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने दुरुस्तीच्या कामाला मोठी मदत झाली. सामान्यतः या स्वरूपाचे काम पूर्ण करण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. मात्र महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे अवघ्या पाच दिवसांत ४० खांब उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. दिवाळीच्या काळात अंधारात राहावे लागलेल्या ग्रामस्थांना पुन्हा प्रकाश मिळाल्याने ग्रामस्थांनी महावितरणचे आणि विशेषतः प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांचे आभार मानले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.