ठाणे(प्रतिनिधी) - सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांनी मनोरुग्णालयात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यातून रुग्णांचे मनोबल उंचावून त्यांच्या पुनर्वसनाला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तथा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. निपुण विनायक यांनी केले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधोपचारांसोबतच व्यवसायोपचार, जीवनकौशल्य प्रशिक्षण आणि पुनर्वसनावर भर दिला जात आहे. रुग्णांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. विनायक यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट देऊन स्त्री व पुरुष रुग्णकक्ष, आरोग्य सुविधा, उपचारपद्धती आणि पुनर्वसन प्रक्रियेची पाहणी केली. महिला व्यवसायोपचार विभागातील कौशल्यविकास उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी डॉ. विनायक यांनी रुग्णांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक परिस्थितीची विचारपूस केली. उपचार, औषधे, आहार आणि सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णांनीही मिळणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. मनोरंजनगृहात रुग्णांनी मराठी व हिंदीतील जुनी गाणी आणि प्रार्थना सादर करून आपल्यातील कलागुणांची झलक दाखवली. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पुढील महिन्यात रुग्णांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे आवाहन डॉ. विनायक यांनी केले. सेवाभावी सामाजिक संस्थांचा मनोरुग्णालयाला होणारे सहकार्य व सहभाग याबद्दलचा पुढील महिन्यात आपण रुग्णालयाला भेट देऊन चर्चा करून नियोजन करू. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी रुग्णालयातील विविध सेवांची माहिती दिली.
या भेटीदरम्यान आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. सुनील भोकरे, उपसचिव राजश्री सारंग, अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) डॉ. श्रीनिवास कोलोड, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाच्या सदस्य अनुराधा बिडवे, अकीला महेश्वरी, सरस्वती सुरेश, अगस्तू फाऊंडेशन व बॅनियान संस्थेचे प्रतिनिधी तसेच डॉ. सुहास माने, डॉ. अमोल भुसारे, डॉ. प्राची चिवटे, यशोदा नाईक आणि रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.