loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'हमारा फाऊंडेशन'चा व जिओ रोटी घर आणि फराळ वाटप व ड्रेस वाटप सोहळा

मुंबई : दिवाळीच्या पावन पर्वावर 'हमारा फाऊंडेशन' च्या वतीने मुंबईतील इंदिरा नगर, दादर, वरळी, शिवनेरी आणि के.के. मार्ग येथील विविध वस्त्यांमध्ये भव्य दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजातील गरजू बांधवांमध्ये एकूण २७० दिवाळी फराळाची पाकिटे वाटण्यात आली. केवळ फराळच नव्हे, तर लहानग्यांची दिवाळी अधिक गोड व्हावी यासाठी मुलांसाठी बांगड्या, अंगठ्या तसेच मुला-मुलींसाठी १२१ नवीन ड्रेसचेही वाटप करण्यात आले. नवीन कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा संपूर्ण उपक्रम 'जिओ रोटी घर' यांनी प्रायोजित केला होता. कार्यक्रमाला 'जिओ रोटी घर'चे संस्थापक राजेश रसिकलाल शाह, सौरभ, मितेश शाह, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष आंबोकर आणि सुवर्णा आंबोकर यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दिशा हिरे, समन्वयक योगेश मालगावकर, सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी वाडेगावकर, शिक्षिका साक्षी वाघधारे, शिक्षिका पूजा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे, पूनम सदाफुले, अमरीन शेख, तुषार कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

"दिवाळी म्हणजे केवळ आपल्या घरातला आनंद नाही, तर तो समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच खरे दिवाळीचे औचित्य आहे. आनंद, आपुलकी आणि एकतेची भावना पसरवणे हाच या उपक्रमामागील उद्देश आहे," असे यावेळी संस्थापक श्री. राजेश शाह यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आनंदात सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg