loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वामी समर्थ सेवा मंडळ संगमेश्वर पंचक्रोशीकडून ऑनलाइन देयक सेवेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त पोलीस किशोर जोयशी यांचा सन्मान

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून नागरिकांना पारदर्शक, जलद आणि सुलभ रीतीने ऑनलाइन देयक सेवा पुरवण्यात अप्रतिम कामगिरी करत रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी यांनी या सेवेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल, स्वामी समर्थ सेवा मंडळ संगमेश्वर पंचक्रोशीच्या वतीने पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोयशी यांचा संगमेश्वर पोलीस ठाण्यात एका विशेष कार्यक्रमात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्वामी समर्थांची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास व्यासपीठावर पोलीस निरीक्षक मितेश केणी व पोलीस उपनिरीक्षक महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे आयोजन स्वामी समर्थ सेवा मंडळा कडून करण्यात आले होते. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुनील गेल्ये, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र दोरकडे, जनार्दन शिरगावकर, माजी सरपंच सीताराम पड्ये, अशोक पड्ये, अनंत मांडवकर, मंगेश मांडवकर, प्रकाश घडशी व संतोष मुडेकर उपस्थित होते. सर्वसामान्यांना शासकीय सेवा व परवानग्या घरबसल्या, पारदर्शक, दप्तर दीरंगाई शिवाय आणि विनासायास उपलब्ध करून देणे हा आहे. सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागू नयेत आणि नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा, हा या पोर्टलचा थेट लाभ जनतेला मिळतो. संगमेश्वर पोलीस ठाण्यात किशोर जोयशी यांनी या पोर्टलच्या उद्देशाला खर्‍या अर्थाने सार्थ ठरवत, पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येक नागरिकाला अत्यंत तत्परतेने सेवा दिली आहे. शासकीय सेवा नागरिकांच्या दारापर्यंत सुलभतेने पोहोचवून त्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी पोलीस प्रशासनाने त्यांच्या अशाच कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले होतेच; आता थेट संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी पोलीस दलाचा गौरव संपूर्ण राज्यात वाढवला आहे. अशा निष्ठावंत व कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांमुळेच प्रशासनाची प्रतिमा उंचावते, असे गौरवोद्गार पेंढारी यांनी काढले.

टाईम्स स्पेशल

उद्योजक सुनील गेल्ये यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण ज्या समाजात राहतो आणि वावरतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतूनच स्वामी समर्थ सेवा मंडळ संगमेश्वर पंचक्रोशी निरंतर विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. समाजात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणार्‍या गुणवंत व्यक्तींचा सन्मान करणे हे देखील मंडळाचे आद्य कर्तव्य मानले जाते. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा संपूर्ण संगमेश्वर पंचक्रोशीला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे प्रशासनात काम करणार्‍या इतर कर्मचार्‍यांनाही नक्कीच मोठी प्रेरणा मिळेल. छोट्याखानी कार्यक्रमाला ग्रामस्थ, कार्यक्षेत्रातील पोलीस पोलीस पाटील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg