loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईत छटपूजा उत्सव उत्साहात संपन्न; उत्तर भारतीय बांधवांना शुभेच्छा

नवी मुंबई, : शहरात छटपूजा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून सर्व उत्तर भारतीय बांधवांना आणि भगिनींना छटपूजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.सूर्यदेव आणि छठी मातेची पूजा करण्यासाठी शहरातील घाटांवर व उत्सव स्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. आयोजकांकडून भाविकांसाठी विशेष सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी भाजपा नेते श्री. निलेशजी म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, मंडळ अध्यक्ष श्री. अजयजी सिंग, श्री. प्रल्हादजी महासेठ, श्री. जयरामजी पासवान, श्री. किरणजी वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, उत्सव समितीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि छटपूजेसाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg