loader
Breaking News
Breaking News
Foto

गावखडी श्री स्वामी समर्थ मठात पंचरात्रौत्सव निमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी श्री स्वामी देव व श्री गुरुदेव दास दिगंबर स्वामी यांच्या कृपेने प्रतिवर्षी मठामधे नवरात्रौत्सव दरम्यान ललिता पंचमी ते महानवमी असा पांच दिवसांचा श्री भगवती आणि परब्रम्ह श्री स्वामी समर्थ देव यांचा पंचरात्रौत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी पंचरात्रौत्सव सोहळा गुरूवार दि. १५ ऑक्टोबर २०२६ ते सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न होणार आहे. पंचरात्रौत्सव सोहळ्यामधे प्रथम दिन पंचमी श्री ललिता देवी पूजन, द्वितीय दिन-षष्ठी देवी पूजन, तृतीय दिन-श्री महालक्ष्मी पूजन, चतुर्थ दिन -श्री दुर्गादेवी पूजन, पंचम दिन -श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली पूजन. अशाप्रकारे कलश स्थापन करून पूजन होईल. तरी कलश पूजनाला बसून पूजनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तगणांनी आपली नांवे त्वरीत मठामध्ये नोंदवावीत. या कार्यक्रमाचा भाविक भक्तगण यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg