loader
Breaking News
Breaking News
Foto

भारताला राष्ट्रभाषा नाही, आर्टिकल १९ मध्ये दुरुस्ती करून व्हिसा कायदा लागू करावा - स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी

नालासोपारा : भारत हे एक भाषिक संघराज्य आहे, म्हणून भारताला राष्ट्रभाषा नाही. भारतीय घटनेतील आर्टिकल १९ नुसार नागरिकाला कुठेही संचार, स्थायिक होण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. या अधिकारामुळे अविकसित राज्यातील लोक मोठ्या संख्येने महाराष्ट्रात स्थलांतरित होत आहेत. हे चक्र असेच सुरू राहिले तर येत्या काही दशकात महाराष्ट्रात मराठी माणूस अल्पसंख्यांक होईल, असा इशारा स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने दिला आहे. महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्यांनी संख्या वाढताच मतदारसंघ तयार करून स्वतःचे नेते तयार केले आहेत आणि त्याच जोरावर मराठी नेत्यांवर दबाव टाकून सोयी-सवलती मिळवत आहेत. एवढेच नव्हे तर संख्याबळाच्या जोरावर स्थानिक मराठी भाषा आणि संस्कृतीला नाकारण्याचे प्रकार वाढले आहेत. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य केल्याच्या प्रकरणातून हे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे स्थलांतरित लोक महाराष्ट्रात मराठी लोकांना नोकऱ्या, घरे नाकारत आहेत, तर एका विशिष्ट अल्पसंख्याक समाजाकडून खाद्य संस्कृतीवरून घरे नाकारली जात आहेत. काही वर्षांपूर्वी दहिसरमधील एका सोसायटीत नाट्य निर्मात्याच्या पत्नीला आणि मुलीला मांसाहार करते म्हणून मारहाण झाली होती. अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये कामकाजात मराठी भाषेला डावलले जात असून, बोरीवली येथे मराठी सभासदांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे समितीने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणारे लोंढे प्राधान्याने थांबवणे आवश्यक असून, आर्टिकल १९ मध्ये दुरुस्ती करून कोणत्याही राज्यात स्थलांतरासाठी त्या राज्याची परवानगी म्हणजेच व्हिसा कायदा करावा, अशी मागणी समिती करत आहे. तसेच प्रत्येक राज्यातील निवडणुका व मतदानाचा हक्क फक्त त्या राज्यातील नागरिकांनाच मिळावा आणि शासकीय सवलतीही त्यांनाच मिळाव्यात, यासाठी भारतात द्वि-नागरिकत्व कायदा करावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस आमरेश पाथरे यांनी नालासोपारा येथे दि. ४ व ५ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या सह्यांच्या मोहिमेदरम्यान केली. या दोन दिवसीय मोहिमेत ४०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.

टाईम्स स्पेशल

आर्टिकल १९ दुरुस्तीसाठी जनमत तयार करण्यासाठी येत्या १ मे, २०२७ रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे सुतोवाच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी केले आहे. त्यासाठी विविध विभागांमध्ये जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. या मोहिमेत जयराम वीर, कृष्णा भरत सावंत भोसले, राजेश राणे, संजय धुरी, जेष्ठ समाजसेवक विजू मामा, जितेंद्र चोरगे, युसुफ कुरेशी, मनोज वैती यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मराठी नागरिक सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg