loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेकडून स्वच्छता रक्षकांना दिवाळी फराळ वाटप; नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांचा उपक्रम

खेड : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता रक्षकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता रक्षकांचे योगदान मोलाचे आहे. दिवाळीसारख्या सणातही ते न थकता आपले कर्तव्य बजावत असतात, त्यांच्या या कार्याची दखल घेत हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक संजय मोदी, समाजकल्याण सभापती यश खेडेकर, नगरसेवक प्रेमळ चिखले, सर्फराज पंगारकर, शमशूद्दीन खान, अश्विनी वडके आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी स्वच्छता रक्षकांच्या कामाचे कौतुक केले. "खेड शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यात स्वच्छता रक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कष्टामुळेच आपण स्वच्छ वातावरणात सण साजरे करू शकतो. त्यामुळे दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत वाटणे हे आमचे कर्तव्यच आहे," असे त्या म्हणाल्या. उपस्थित मान्यवरांनीही स्वच्छता रक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला सलाम केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg