loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वपक्षीय निषेध मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यापासून चिंचनाका मार्गे प्रांत कार्यालय येथे सर्व पक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव, उप जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उप तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक तसेच सर्व सेलचे सर्व पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र याठिकाणी एकत्र सकाळी १० वाजता जमावयाचे असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनिष विलास पाथरे, रत्नागिरी जिल्हा संघटक आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg