loader
Breaking News
Breaking News
Foto

26 नोव्हेंबर रोजी रानवी येथे संविधान दिनाचे आयोजन, बौद्धजन सहकारी संघ, रानवी शाखेचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) - बौद्धजन सहकारी संघ रानवी शाखा क्र. 05, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर विभाग नं.-1 महिला मंडळ व बौद्धजन सहकारी संघ रानवी शाखा क्र.- 05 गाव व मुंबई या धम्म संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी गुहागर तालुक्यातील रानवी बौद्धवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 10:00 वाजता आयटीआय रानवी येथे संविधान मंदिर दर्शन सोहळा त्यानंतर सकाळी 11:00 वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून सकाळी 11:15 वाजता संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर दुपारी 12:00 वाजता रानवी शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि सभासद महिला - पुरुषांचा सत्कार, सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर प्रमुख वक्ते आयु. संजय गमरे यांचे संविधान दिनावर मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर दुपारी 01:30 वाजता उपस्थित सर्वांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला रानवी पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ रानवी शाखा क्र. 05 या धम्म संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg