loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल मंडळात संभाव्य पाणीटंचाईचा प्रशासनाकडून संयुक्त आढावा; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती

राजापूर (तुषार पाचलकर) : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीतील निर्देश व उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्या आदेशानुसार आज पाचल मंडळात संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थितीचा संयुक्त आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर पाचल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंडळनिहाय प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचल मंडळस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंडळ कार्यक्षेत्रातील गावांमध्ये उद्भवू शकणाऱ्या टंचाईच्या झळा, उपाययोजना, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य अविनाश पराडकर, अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर आणि पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार उपस्थित होते. तसेच पाचल मंडळातील विविध गावांमधील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी बैठकीला मोठ्या संख्येने हजेरी लावली. संभाव्य टंचाईच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी भूमिका यावेळी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg