loader
Breaking News
Breaking News
Foto

भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या नंदिनी चव्हाण, मार्तंड झोरे यांना रौप्यपदके

रत्नागिरी (जमीर खलफे) : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या नंदिनी चव्हाण हिने रांगोळी स्पर्धेत रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धेत मार्तंड झोरे याने रौप्यपदक पटकावले.अंतिम फेरीतील अतिशय चुरशीच्या वातावरणात नंदिनीने आपल्या कल्पकतेने आणि उत्कृष्ट हस्तकलेच्या जोरावर आकर्षक रांगोळी साकारून परीक्षकांची मने जिंकली आणि रौप्यपदक आपल्या नावावर केले. या स्पर्धेसाठी हिला रांगोळीकार विलास रहाटे यांचे मोलाचे व तांत्रिक मार्गदर्शन लाभले. टीम मॅनेजर सौ. कस्तुरी कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संयोगिता सासने, प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांचे प्रोत्साहन मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच महाविद्यालयाचा अष्टपैलू कलाकार मार्तंड झोरे याने पोस्टर मेकिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावून दुहेरी यशाची नोंद केली आहे. या स्पर्धेत मार्तंडने आपल्या उत्कृष्ट कलाकृतीने आणि प्रभावी संकल्पनेच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली आणि रौप्यपदक मिळवले. मार्तंडच्या या सलग दुसऱ्या यशामुळे महाविद्यालयाच्या कला क्षेत्रामधील वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्याला फाईन आर्टचे डायरेक्टर विलास रहाटे यांचे मार्गदर्शन लाभले. एकाच महोत्सवात वादविवाद, रांगोळी आणि चित्रकलेच्या विविध प्रकारांत महाविद्यालयाने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात कीर विधी महाविद्यालयाच्या चमूचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg