loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सोमवारी मेढे नागनाथ मंदिरात राहणार उपस्थित

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गोवा राज्यातील खासदार सिंधुदुर्ग जिल्ह्यशी जवळचे नाते असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी दोडामार्ग तालुक्यात खाजगी दौऱ्यावर येत आहेत. ते तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिरात उपस्थित राहणार आहेत. यावेळी या ठिकाणी अभिषेक इतर कार्यक्रम तसेच काही मान्यवर यांचा सत्कार केला जाणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी दिली. केंद्रीय मंत्री तेरवण मेढे नागनाथ मंदिरात अभिषेक करून या भागातील जंगली हत्ती उपद्रव बाबत सूर्याजी उर्फ बाळू झेंडे यांच्या निवासस्थानी चर्चा करणार आहेत. या नंतर दुपारी साडेचार वाजता डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात भेट देऊन दर्शन घेणार, असे संजय नाईक यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg