loader
Breaking News
Breaking News
Foto

करंबेळे घाटात स्विफ्ट डिझायर आणि एर्टिगा गाडीचा अपघात; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

मकरंद सुर्वे (संगमेश्वर) - संगमेश्वर–देवरुख मार्गावरील करंबेळे घाटात आज, बुधवारी सकाळी स्विफ्ट डिझायर आणि एर्टिगा या दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर–देवरुख मार्गावर करंबेळे घाट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अशातच बुधवारी सकाळी दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाल्याने परिसरात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघाताची अधिक माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg