loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारखाणी बु. येथील विशेष बैठकीत दुष्काळ परिस्थितीचा आढावा, जि.प. सदस्य संतोष थेराडे पं.स. सदस्य दत्ता लाखन यांची प्रमुख उपस्थिती

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी बुद्रुक येथे नुकताच दुष्काळी परिस्थितीचा आढावा व इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी जि. प. सदस्य संतोष थेराडे पं. स. सदस्य दत्ता लाखन, मंडळ अधिकारी वळवी, कृषी अधिकारी भानुदास दौड, यांच्या प्रमुख उपस्थिती त ग्रामपंचायत कुंभारखाणी बु. च्या सभागृहामध्ये सभा घेण्यात आली. सदर सभेचे महत्व लक्षात घेता सभेचे संचलन माजी सभापती विकास सुर्वे यांनी केले. दुष्काळ, शेतकरी, पाणी दुर्भीक्ष, बंधारे, टँकर, पैसे असूनही भविष्यातील पाणी समस्या, पर्यावरण आणि भुजल आदी विषयावर आपल्या अमूल्य अनुभवाने संतोष थेराडे, विकास सुर्वे यांनी सभागृहास प्रबोधित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रत्नागिरी जिल्हा जल साक्षरता दूत महेंद्र कदम यांनीही जल साक्षरता विषयावर सभेस प्रबोधित केले. संजय साळवी, राजेंद्र कदम, विनायक सुर्वे, दिलीप सुर्वे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे ग्रामपंचायत कुंभारखाणी बु. वतीने शाल श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. जेष्ठ मार्गदर्शक विकास सुर्वे यांना शाल श्रीफळ देऊन जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी सन्मानीत केले. सभागृहात कुंभारखाणी बु. कुचांबे गावातील आजी, माजी सरपंच, तंटामुक्ती अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, बचत गत महिला, शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सर्व नियोजन ग्रामपंचायत कुंभारखाणी बु. चे ग्रामसेवक राहुल चौधरी यांनी करून पाणी समस्या आणि सध्य स्थिती दाखवणारा ग्राम आराखडा जिल्हा परिषद सदस्य थेराडे यांजकडे सुपूर्द केला. हुंभरठ, भराडे, मधलीवाडी नळपानी योजना, जलजीवन मिशन टप्पा 2 मधलीवाडी लाखन गावकरवाडी योजना याबाबत सखोल चर्चा व आढावा घेण्यात आला. आपल्या मतदार संघात पाणी अडवण्याच्या बाबतीत प्रथमच बंधारे बांधन्यांचे काम कुंभारखाणी बु.मध्ये झाल्यामुळे गाववाल्याचे, महिला बंधू भगिनींचे विशेष कौतुक केले. व कुंभारखाणी बु.चा आदर्श परिसराने घेण्याचे आवाहन थेराडे जि. प. सदस्य आणि प्रशासनाने व्यासपीठावरून केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg