loader
Breaking News
Breaking News
Foto

क्षत्रिय मराठा मंडळाचा १९ वा वर्धापनदिन दणक्यात साजरा

रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळ गेल्या १९ वर्षांपासून दर्जेदार, समाजोपयोगी काम करत आहे. समाज एकत्र येऊन आपापसातील स्नेहबंध दृढ होण्यासाठी व सामूहिक बांधिलकी रुजण्यासाठी मंडळांचा वाटा मोठा असतो. मंडळाच्या अशा विविध कार्यक्रमांमुळेच एकजुटीची भावना व जिव्हाळ्याचे नाते समाजात निर्माण होते. त्यातूनच आपण मराठा बिझनेसमन फोरम (एमबीएफ) यासारखे मोठे व्यावसायिक संघटन करू शकतो. भावी पिढीसाठी हे फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन देशातील नामवंत मानव संसाधन प्रमुख, व्यवसाय उत्कृष्टता आणि नेतृत्व प्रशिक्षक राजेंद्र घाग यांनी केले. क्षत्रिय मराठा मंडळाच्या १९ वा वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. टीआरपी येथील अंबर हॉल येथे यानिमित्त रंगारंग सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, प्रमुख पाहुणे फणस उद्योजक मिथिलेश देसाई, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, प्रचारप्रमुख संतोष तावडे, ज्येष्ठ सल्लागार सतीश साळवी यांनी दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज व माता तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाला उपस्थित रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचे स्वागत उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षीप्रमाणे सकाळी माता श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची पूजा, आरती झाली. सायंकाळी झालेल्या रंगारंग सोहळ्याची सुरवात महाराष्ट्र गीताने करण्यात करण्यात आली. श्रेया पाटील हिने गायलेल्या गणेशवंदनेवर श्रावणी सावंत हिने भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर वर्षभरात निधन झालेल्या मंडळाच्या सभासद, कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात लांज्याचे फणसकिंग मिथिलेश देसाई यांना क्षत्रिय मराठा समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांचे वडिल हरिश्चंद्र देसाई यांचेही अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिथिलेश देसाई यांच्याशी संवाद साधून फणसकिंगचा प्रवास जाणून घेतला होता. कोकणचा फणस जागतिक पातळीवर कसा पोहोचवला आहे, याबाबतचा प्रवास देसाई भाषणात उलगडून दाखवला. आपल्याच समाजाकडून होणाऱ्या गौरवाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना देसाई यांनी त्यांच्या कुटुंबात दोन पिढ्या घेतल्या जाणाऱ्या फणस उत्पादनाचे महत्त्व, त्यापासून मिळू शकणाऱ्या जोड उत्पादनांचे महत्त्व समजावून सांगितले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाने प्रथेप्रमाणे ९० वर्षांवरील आजीव सभासदांच्या घरी जाऊन व ७५ वर्षांवरील सभासदांचा सन्मान या कार्यक्रमात केला. कार्यक्रमात गुणवत्तेला व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रावीण्य, शिष्यवृत्ती परीक्षा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे लकी ड्रॉ सोडतीने कार्यक्रमात रंगत आणली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कौस्तुभ सावंत यांनी करून दिला. सूत्रसंचालन अमित कदम आणि सचिव योगेश साळवी यांनी केले, उद्योजक जितेंद्र सावंत यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg