loader
Breaking News
Breaking News
Foto

वीर कळकेवाडी नळपाणी योजनेचे भूमिपूजन संपन्न १५ लाखांचा निधी मंजूर

चिपळूण (ओंकार रेळेकर) - वीर कळकेवाडी गावासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी उत्साहात संपन्न झाले.ठाकरे शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नातून वीर कळकेवाडी गावासाठी १५ लाख रुपयांची स्वतंत्र नळपाणी योजना मंजूर झाली असून, या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन तुरंबव गावचे माजी सरपंच सुनील जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भूमिपूजन कार्यक्रमाला चिपळूण तालुका प्रमुख सुभाष जाधव, तुरुंबव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील जाधव, वीर गावचे शाखाप्रमुख विजय बेंडल,सुरेश कळके, रमेश सोलकर, धोंडू कळके, भागोजी भेबळे, गणपत केळके, विलास दुर्गले, दिलीप जाधव, महादेव कळके, सीताराम भुवड यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंजूर करण्यात आलेली ही योजना ग्रामस्थांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे कळकेवाडीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नातून गावाच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg