loader
Breaking News
Breaking News
Foto

भंडारी हायस्कुल मालवणची विद्यार्थीनी दुर्वा राणेची कबड्डी राज्यस्तर चाचणीत निवड

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मालवणची इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली विध्यार्थिनी दुर्वा नंदकिशोर राणे हीची कबड्डी स्पर्धेच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुमारी दुर्वा राणे हिला क्रीडा शिक्षक आर. बी. देसाई, हरिश्चन्द्र साळुंखे यांची मार्गदर्शन लाभले. दुर्वा नंदकिशोर राणे हीच्या या निवडीबद्दल भंडारी एज्यू सोसायटी मालवणचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे व संस्था चालक, पदाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

दुर्वा नंदकिशोर राणे हीची मेहनत व जिद्द तसेच तिला प्रशालेतील शिक्षकांचे मिळणारे योग्य मार्गदर्शन त्यामुळे हे यश ती प्राप्त करू शकली. संस्थेला व प्रशालेला तिचा अभिमान असून तिच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना संस्था पदाधिकारी व प्रशालेचे शिक्षक यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg