loader
Breaking News
Breaking News
Foto

मिशन आपुलकी अंतर्गत निळवणे नं.१ शाळेला सुभेदार गोपीनाथ कदम यांच्या कडून खुर्च्या भेट

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा निळवणे नं. १ शाळेला मिशन आपुलकी अंतर्गत १८ खुर्च्या निवृत्त सुभेदार गोपीनाथ कदम यांनी वडील कै. बाबुराव गणोजी कदम यांच्या स्मरणार्थ भेट दिल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक नितीन साळुंके यांनी निळवणे गावचे पोलीस पाटील जगन्नाथ कदम यांच्याकडे शाळेच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीचा विचार करून त्यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ शाळेला १८ खुर्च्या भेट दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या खुर्च्या वितरण कार्यक्रम प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक काशिराम कदम, निवृत्त सुभेदार गोपीनाथ बाबुराव कदम, पोलीस पाटील जगन्नाथ कदम, माजी सरपंच चंद्रकांत कदम, कळंबणी पोलिस पाटील नरसिंह सुतार, शामराव कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण निर्मळ, विश्वास कदम, संदेश खोपडे, मुख्याध्यापक नितीन साळुंके, अनंत मोरे, विशाल सोनवलकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परेश खोपडे यांनी केले तर आभार अनंत मोरे यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg