ठाणे (प्रतिनिधी) - शाळेच्या नावाखाली वर्षानुवर्षे अडकवून ठेवलेला रानमाळ बनलेला भूखंड अखेर मुलांच्या खेळण्यासाठी खुला करून भाजपने ठाणेकरांना दिवाळी भेट दिली आहे. नौपाड्यातील भगवती शाळेसमोरील ठाणे महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित भूखंडावर नव्याने शाळा उभारण्याचा प्रस्ताव रद्द करून हा भुखंड खेळाडूंना मैदान म्हणून खुला करण्यात आला. दिवाळीच्या मुहूर्तावर आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत मैदान खुले झाल्याने नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले. ठाणे महापालिकेच्या १९७२ च्या विकास आराखड्यात नौपाडा, विष्णुनगर येथील भूखंडावर शाळा आणि खेळाच्या मैदानाचे आरक्षण होते. त्यानुसार १९९२ मध्ये येथे भगवती शाळेची उभारणी करण्यात आली. मात्र, उर्वरित भूखंड मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी दुर्लक्षित करण्यात आली होती. त्यातच २०१९ मध्ये सत्तेचा गैरवापर करून या भूखंडावर आणखी एका शाळेचा प्रस्ताव घाईघाईने मंजूर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, संबंधित संस्थेने गेल्या अनेक वर्षांत येथे कोणतेही बांधकाम केले नव्हते. परिणामी, मोकळ्या भूखंडावर झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण होऊन परिसराला जंगलाचे स्वरूप आले होते. विषारी सापांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला होता. त्यातच 'गुडवील' नामक संस्थेकडून महापालिकेला सुमारे १२ कोटी रुपये येणे असल्याची बाबही समोर आली. या सर्व बाबींचा विचार करून आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे आणि प्रतिभा मढवी यांनी नव्याने महासभेत प्रस्ताव मांडला. संभाव्य नवीन विकास आराखड्यात या भूखंडाचे आरक्षण खेळाच्या मैदानासाठी प्रस्तावित असल्यास पूर्वीचे शाळेचे आरक्षण रद्द करून हा भूखंड स्थानिक नागरिक, तरुण आणि खेळाडूंसाठी खुला करावा, अशी ठाम भूमिका मांडली.
अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळुन दिवाळीच्या मुहूर्तावर दोन्ही भाजप आमदार आणि स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. यामुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असून, अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या भूखंडाला पुन्हा मैदानाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. यावेळी स्थानिक नगरसेवकांनी महापालिका आयुक्त आणि सहाय्यक नगररचनाकार यांचे आभार मानले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.