loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत शालेय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; ६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

​सावंतवाडी (प्रतिनिधी): एस. सी. स्पोर्ट्स अकॅडमी, मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि स्वास्थ्य संकल्प समिती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ​युवराज लखमराजे भोसले यांच्या संकल्पनेतून श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आगामी जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६० हून अधिक शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ​सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू (नोंदवही) प्रदान करण्यात आली. तसेच विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेचा निकाल ​१४ वर्षांखालील मुली (एकेरी): विजेती: स्वरा राऊळ, ​उपविजेती: अस्मि कविटकर ​१४ वर्षांखालील मुले (एकेरी): ​विजेता: आदित्य पिळगावकर, ​उपविजेता: ग्लेन डिसिल्व्हा ​१७ वर्षांखालील मुले (एकेरी): ​विजेता: हर्षद धारगळकर, ​उपविजेता: मोहित सारंग ​१७ वर्षांखालील मुली (एकेरी):​विजेती: राधिका सोनाळकर, उपविजेती: गौरवी बोडेकर ​१७ वर्षांखालील दुहेरी (गट): ​विजेते: ग्लेन डिसिल्व्हा आणि अनय नाटेकर, उपविजेते: आदित्य पिळगावकर आणि रक्षण सावंत आदीचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg