पाचल / सुरेश गुडेकर : पुस्तकांशी मैत्री झाली की ज्ञानाचे नवे विश्व खुले होते, कल्पनाशक्तीला पंख फुटतात आणि विचारांना नवी दिशा मिळते. याच विचारातून जि. प. प्राथमिक शाळा झर्ये नं. १, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे राबविण्यात येणारा ‘पुस्तकांच्या मनातलं’ हा अभिनव व कल्पक वाचन उपक्रम सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. ‘पुस्तके बोलू लागली आणि मुलं ऐकू लागली!’ या अनोख्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या भावविश्वाची सफर घडविण्याचा सुंदर प्रयत्न शाळेत सुरू आहे.आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि विविध स्क्रीनच्या वाढत्या आकर्षणामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तकांशी असलेले नाते काहीसे दूर जात असल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी त्यांची मैत्री व्हावी आणि वाचनातून आनंद मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकांनाच बोलते केले जाते! जणू एखादे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर उभे राहून स्वतःची कहाणी सांगत आहे, आपल्या भावना व्यक्त करीत आहे आणि आपल्या पानांमधील ज्ञानाचा खजिना उलगडत आहे, असा कल्पक अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. पुस्तकाचे मनोगत, त्यातील पात्रे, घटना, प्रसंग, विचार आणि संदेश यांचा परिचय करून घेताना विद्यार्थी पुस्तकांच्या विश्वात रममाण होतात.विशेष म्हणजे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तक वाचण्यापुरते मर्यादित ठेवले जात नाही, तर वाचलेल्या साहित्यावर विचार करणे, प्रश्न विचारणे, स्वतःचे मत मांडणे, कल्पनाशक्तीचा वापर करणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त होणे अशा विविध कौशल्यांना वाव दिला जात आहे.
शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपदा, वाचन आकलन, भाषिक अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होत आहे. पुस्तकांकडे केवळ अभ्यासाचे साधन म्हणून न पाहता एक जिवलग मित्र म्हणून पाहण्याची नवी दृष्टी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे.या अभिनव उपक्रमाचे संकल्पनात्मक नियोजन व मार्गदर्शन शाळेचे उपशिक्षक श्री. नितीन प्रभाकर पांचाळ करीत आहेत. त्यांच्या कल्पक संकल्पनेतून पुस्तक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘पुस्तकांच्या मनातलं’ हा उपक्रम म्हणजे केवळ वाचनाचा तास नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची बीजे पेरणारी आणि वाचनसंस्कृतीची रुजवण करणारी एक सुंदर शैक्षणिक चळवळ आहे. पुस्तकांच्या पानांमधील शब्द जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाशी संवाद साधू लागतात, तेव्हा शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित राहत नाही, तर ते अनुभवसमृद्ध बनते. पुस्तके बोलू लागली, मुले ऐकू लागली आणि वाचनातून नवे विचार फुलू लागले... झर्ये शाळेचा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे!







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.