loader
Breaking News
Breaking News
Foto

भोईघरमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारा

कोर्लई, (राजीव नेवासेकर) - गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाने दांडी मारल्याने व एल निनोच्या प्रभावामुळे संभाव्य भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायतीमध्ये अभियान स्वरूपात लोकसहभागातून बंधारे बांधण्यात आले. त्याचाच भाग भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील नदीवर लोकसहभागातून पाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारा बांधण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्योती नागावकर, तालुका पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी प्रसाद माळी, कृषी सहाय्यक आदिराज चौलकर, सरपंच हर्षद संजय महाडिक, उपसरपंच सुचिता सुशील कासार, सदस्य काशिनाथ वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष नागोठकर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यंदा एल निनो च्या प्रभावामुळे व महिनाभरापासून परतीच्या पावसाने दांडी मारल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून तालुका पंचायत समितीतर्फे ग्रामपंचायत हद्दीत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आल्याने त्याचा गावांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या ज्योती नागावकर यांनी यावेळी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg