loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुरत्न योजनेचा पहिल्या टप्पा जाहीर, मात्र १५० कोटींपैकी तब्बल ६४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी अजूनही कागदावरच अडकून

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’च्या निधीवरून कोकणातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकारकडून दरवर्षी ५० कोटी याप्रमाणे तीन वर्षांत एकूण १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची मोठी घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या तीन वर्षांच्या कालावधीत ८५ कोटी ४५ लाख रुपयांच्याच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यापैकी प्रत्यक्ष ६९ कोटी ८२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जाहीर केलेल्या १५० कोटींपैकी तब्बल ६४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी अजूनही कागदावरच अडकून पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता या उर्वरित कोट्यवधींच्या निधीला मंजुरी आणून तो जिल्ह्यांसाठी खेचून आणण्याची खरी आणि मोठी जबाबदारी भाजपचे माजी आमदार तथा सिंधुरत्न समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या खांद्यावर आली आहे. सध्या राज्याचे अर्थ खाते थेट मुख्यमंत्र्यांकडे आहे. अशा स्थितीत डॉ. विनय नातू आपल्या राजकीय वजनाचा आणि संबंधांचा उपयोग करून मागील तीन वर्षांतील शिल्लक राहिलेला ६४ कोटी ५५ लाखांचा निधी तसेच त्याला आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता मिळवून देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

दुसरीकडे, या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात तब्बल २०० कोटी रुपयांच्या निधीची नवी घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील निधी मिळवताना झालेल्या ताणाताणीच्या पार्श्वभूमीवर, आता दुसर्‍या टप्प्यातील या २०० कोटींमधील प्रत्यक्ष किती निधी कोकणाच्या पदरात पडणार, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी डॉ. विनय नातू मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आपले नेमके किती वजन वापरतात आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या या वजनाला कितपत दाद मिळते, यावरच सिंधुरत्न योजनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आगामी काळात डॉ. नातू शिल्लक ६४ कोटींसह दुसर्‍या टप्प्यातील निधी आणून कोकणाला दिलासा देतात की हा निधी केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg