loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण ठाकरे सेनेतर्फे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शाईना एनसी यांचा निषेध ; शाईना एनसी यांच्या फोटोला काळे फासून केला निषेध

चिपळूण (संतोष पिलके) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शाईना एनसी यांनी फोटो फाडून अवमान केला. त्याचा आज गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक चिंचनाका येथे ठाकरे शिवसेना चिपळूण तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. बाळासाहेबांचा अवामान कदापि सहन केला जाणार नाही यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी शायना एनसी यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संपर्कप्रमुख अशोक नलावडे, शहर प्रमुख भैया कदम, तालुका संघटक राजू देवळेकर, शहर सचिव प्रशांत मुळये, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सचिन चोरगे, महिला आघाडी शहर संघटक वैशाली शिंदे, शहर समन्वयक महिला आघाडी श्रद्धा घाडगे, युवा सेना तालुका अधिकारी प्रीतम वंजारे, अधिकारी पार्थ जागुष्टे, युवती सेना उपजिल्हा अधिकारी निशा भोबसकर, युवती सेना तालुका अधिकारी तीर्था लाड, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, उपशहर प्रमुख संजय रेडीज राजन खेडेकर मनोज पांचाळ राजू विखारे माजी नगरसेवक मनोज शिंदे, विभाग प्रमुख संकेत शिंदे, विभाग प्रमुख व नगरसेवक संजय गोताड, समीर राऊत, प्रमोद गांगण, बंड्या काणेकर, नितीन निकम, उपविभाग प्रमुख विकास गांगण, दीपक कदम, मयूर फटकुरे, युवा सेना उपशहर अधिकारी ओंकार गायकवाड पियुष कुबडे, युवा सेना विभाग अधिकारी ऋषिकेश बेचावडे, शाखाप्रमुख अण्णा कटगिरी, आशिष कदम, शिवसैनिक शैलेश टाकळे, प्रतीक शिंदे, उपविभाग प्रमुख अनंत खैर, शाखाप्रमुख महेंद्र काणेकर, सुधीर जाधव आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg