loader
Breaking News
Breaking News
Foto

​निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

सावंतवाडी, (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावांतर्गत येणाऱ्या चार महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामांच्या माध्यमातून निरवडे गावातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. निरवडे गावातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ व सुरक्षित व्हावी, यासाठी या प्रकल्पांतर्गत खालील चार प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते निरवडे पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी व भाईडवाडी ते शेटकरवाडी या कामांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या सर्व रस्त्यांच्या कामांमुळे गावांमधील अंतर्गत दळणवळण अधिक वेगवान होणार असून, परिसरातील नागरिकांना व शाळकरी मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास निरवडे गावाच्या सरपंच सौ. सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, धर्मा माळकर, नारायण माळकर, बाळ्या बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी सतत कटिबद्ध असलेल्या आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि युवा नेते सूरज परब यांच्या विशेष सहकार्यामुळेच ही महत्त्वाची रस्ते कामे मार्गी लागत आहेत, असे सांगत गावाच्या वतीने सरपंच सुहानी गावडे यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg