loader
Breaking News
Breaking News
Foto

गावच्या मातीत शिक्षणाची बीजे रुजवून मुंबईत ज्ञानाचा दीप पेटवणारी ‘नवदुर्गा’!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणच्या मातीत कष्ट, संस्कार आणि जिद्दीची शिकवण घेऊन अनेक तरुण-तरुणी मोठ्या शहरांकडे वाटचाल करतात. मात्र, मोठ्या शहरात पोहोचल्यानंतर आपल्या गावाशी असलेली नाळ कायम ठेवत इतरांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरविणाऱ्या व्यक्ती खऱ्या अर्थाने गावाचा अभिमान ठरतात. अशीच प्रेरणादायी वाटचाल तुरळ गावातील स्नेहल तुरळकर यांनी केली आहे. उच्च शिक्षणाची स्वप्ने उराशी बाळगून त्या मुंबईत पोहोचल्या आणि आज विद्यार्थ्यांना विद्येचे धडे देत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. कोकणातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला स्नेहल यांचा प्रवास हा केवळ शिक्षण आणि नोकरीचा प्रवास नाही; तर ‘मुलगी शिकली तर घर घडते आणि ती पुढे गेली तर समाज घडतो’ याचा प्रत्यय देणारी ही जीवनगाथा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील साधे वातावरण, मर्यादित साधनसुविधा आणि कुटुंबातील संस्कार यांना सोबत घेत स्नेहल यांनी शिक्षणाची वाट धरली. शिक्षण घेत असताना अनेक आव्हाने आली, मात्र परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात स्वतःची ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. मात्र, कोकणच्या मातीत मिळालेली जिद्द आणि कष्ट करण्याची वृत्ती स्नेहल यांच्या पाठीशी होती. त्यामुळे मुंबईतील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.

टाईम्स स्पेशल

आज वर्गात विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहून ज्ञानाचे धडे देताना त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ अभ्यासक्रम नसतो; तर आपल्या विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे, आत्मविश्वासाने जगावे आणि आपल्या स्वप्नांना आकार द्यावा, हीच त्यांची धडपड असते. मुंबईच्या गर्दीत शिक्षण देताना स्नेहल यांच्या मनात मात्र आजही तुरळच्या मातीचा सुगंध दरवळतो. गावातील माणसे, बालपणीच्या आठवणी, शाळेचे दिवस आणि कुटुंबाने दिलेले संस्कार त्यांच्या मनात कायम जिवंत आहेत. त्यामुळेच त्यांच्या यशात तुरळ गावाचाही मोठा वाटा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg