loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान, जय भैरी नाचणे क्लबच्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार 25 नोव्हेंबरपासून

रत्नागिरी: रत्नागिरीतील श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि जय भैरी नाचणे क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान चषक 2026 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर पासून ही स्पर्धा सुरू होत असून 29 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरीतील नामांकीत असे 32 संघ सहभागी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीतील समर्थ रोडलाईन्सचे श्री गजेंद्र शेठ पाथरे तसेच रत्नागिरीच्या कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 4 गटात स्पर्धा खेळवण्यात येईल. प्रत्येक गटात 8 संघ असतील. यातून 2 संघ सुपर 8 मध्ये जातील. 29 नोव्हेंबरला उपांत्य व अंतीम लढती रंगतील. या भव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत विजेते पदासाठी भव्य चषकासह 55 हजार 555 रुपयांचे प्रथम पारितोषिक तर उपविजेते पदासाठी चषकासह 33 हजार 333 रुपयांचे दुसरे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाला बॅट, उत्कृष्ट गोलंदाजाला शूज, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला स्मार्टवॉच देऊन गौरवण्यात येणार आहे. मालिकावीरासाठी अत्याधुनिक सायकल पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्याचा सामनावीर निवडण्यात येणार असून त्याला टी-शर्ट आणि चषक देण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

टेनिस क्रिकेट स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानने यावर्षी प्रथमच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कै प्रमोद महाजन स्टेडियमवर प्रकाशझोतात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील 32 संघ आणि सामन्यांचे वेळापत्रक माहितीसह आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg