loader
Breaking News
Breaking News
Foto

लिंबूपाण्याचा घोट महाग, खेड बाजारामध्ये दहा रुपयांना एक लिंबू

संगलट (प्रतिनिधी) - 'एल निनो'च्या प्रभावामुळे यावर्षी राज्यात सर्वत्र कमी पर्जन्यमान झाल्याने भाजीपाला पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. उत्पादकता घटल्यामुळे खेड बाजारातील आवकही मंदावली आहे. लिंबाचे उत्पादन यावर्षी कमी असल्यामुळे बाजारात लिंबाची आवक कमी आहे. शिवाय ऑक्टोबर हीट असह्य होत असल्याने लिंबासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. काही एक जेवणी तर काही निव्वळ फलाहार करतात, फळांचे सेवन लिंबूपाणी पिऊन राहतात. मात्र भाज्या, फळांसह लिंबाचेही दर वाढले आहेत. त्यामुळे यावर्षी उपवासाचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. सध्या दहा रुपयांना एक तर वीस रुपयांना तीन नग दराने लिंबू विक्री सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांश भाजीपाला, फळांची आवक राज्यासह इतर विविध जिल्ह्यातून होते. काही भागांतून बाजारात होणारी आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. विविध भाज्यांच्या किमतीत चढउतार कायम सुरू आहेत. एरव्ही हिवाळ्यात लिंबाची आवक वाढते व पाच रुपयांना २ ते ३ नग दराने विक्री करण्यात येते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने दर अधिक आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg