केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या, रेल्वे स्थानकावरील अपु-या सोयी सुविधा, रस्ते, रेल्वे गाड्यांचे थांबे, फलाटाची स्थिती तसेच स्थानिक नागरीकांच्या विविध मागण्या सविस्तर अहवाल खासदार नारायण राणे यांच्याकडे सादर करून त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार किरण सांमत यांनी आडवली, विलवडे, वेरवली आणि निवसर येथील रेल्वे प्रवाशी ग्रामस्थांना दिली. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी आज लांजा आणि राजापूर तालुक्यातील विविध रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या समस्या, रेल्वे स्थानकांवरील अपुर्या सोयीसुविधा, रेल्वे गाड्यांचे थांबे, फलाटांची स्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेतला. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाहणी दौरा करण्यात आला असून, या दौर्यात निदर्शनास आलेल्या समस्या आणि आवश्यक विकासकामांचा सविस्तर अहवाल खासदार नारायण राणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले. या दौर्यामध्ये लांजा तालुक्यातील निवसर, आडवली, वेवली आणि विलवडे, तर राजापूर तालुक्यातील सौंदळ आणि राजापूर रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यात आली.
प्रत्येक स्थानकावरील सद्यस्थिती, प्रवाशांची संख्या, उपलब्ध सुविधा आणि भविष्यात आवश्यक असणार्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर आवश्यक एक्स्प्रेस आणि अन्य रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच फलाटांची दुरुस्ती, नवीन फलाटांची उभारणी, फलाटांचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या. रेल्वे स्थानकांकडे जाणार्या अप्रोच रोडची दुरुस्ती व सुधारणा, स्थानक परिसरातील साईटसंबंधित अडचणी, नियमित पाणीपुरवठा आणि परिसरातील स्वच्छता या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रवाशांना स्थानकापर्यंत सहज आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी रस्त्यांच्या विकासाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. प्रवाशांना तिकीट आरक्षणाची सुविधा, आवश्यक रेल्वे कोटा, सुसज्ज प्रतीक्षालय आणि स्थानकांवर बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची ने-आण करणार्या रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र निवारा शेड उभारणे, स्थानक परिसरात स्वच्छतागृहांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करणे या मागण्यांचाही विचार करण्यात आला. तसेच रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळण्यात येणार्या अडचणी, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासंबंधीचे प्रश्न आणि भूसंपादनासंदर्भातील प्रलंबित बाबी यांचाही आढावा घेण्यात आला. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या संधींबाबत योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची भूमिका मांडण्यात आली. रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.
तसेच रेल्वेने येणार्या-जाणार्या प्रवाशांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानकांच्या वेळापत्रकानुसार एस.टी. बससेवेची उपलब्धता आणि योग्य वाहतूक नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.रेल्वे स्थानकांवर महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे आमदारांनी नमूद केले. सुरक्षित प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था, सुरक्षित ये-जा आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्या प्रत्यक्ष सोडविण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौर्यात समोर आलेल्या सर्व समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून संबंधित रेल्वे प्रशासन आणि शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका आमदार किरण सामंत यांनी यावेळी मांडली. लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, स्थानिक रेल्वे स्थानकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी, या उद्देशाने हा पाहणी दौरा करण्यात आला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.