loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपालिकेचा 'भगवान महावीर आयुर्वेदिक व टी. बी. दवाखाना' पुन्हा सेवेत; कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती!

सावंतवाडी : डाॅक्टराअभावी बंद असलेला सावंतवाडी नगरपालिकेचा भगवान महावीर आयुर्वेदिक व टी. बी. दवाखाना आता कायमस्वरूपी पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाला आहे. या दवाखान्यात कायमस्वरूपी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी नियुक्त करण्यात आले आहेत. सावंतवाडी नगरपराषदेचा गेल्या शंभर वर्ष पासून कार्यरत असलेला भगवान महावीर आयुर्वेदिक व टी. बी. दवाखाना डाॅक्टराअभावी गेल्या काही दिवसापासून बंद पडला आहे. या याठिकाणी कार्यरत असलेले डाॅ. मसुरकर हे निवृत्त झाल्याने ही परिस्थिती ओढवली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र शहरवासीयांच्या मागणीनुसार हा दवाखाना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी यासाठी विशेष पाठपुरावा करत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार आता या दवाखान्यात कायमस्वरूपी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी नियुक्त केल्याने या दवाखान्यात १६ ऑक्टोंबरपासून ओपीडी पूर्ववत सुरू झाली आहे. नगराध्यक्षांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण व स्टाफ नर्स करुणा करमळकर, कल्पना संगम यांचे स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोसले यांनी शहरातील व आजूबाजूच्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचा हा दवाखाना होता. आता तो पुन्हा पूर्ववत झाला आहे. त्यामुळे निश्चितपणे आरोग्यदृष्ट्या सावंतवाडी नगरपालिका जनतेच्या सुविधांसाठी नेहमीच कार्यरत राहील असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही हा दवाखाना पूर्व सुरू राहावा यासाठी प्रयत्न केले. यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बाल कल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक नगरसेवक, नगरपालिका, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg