loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पाऊस , चिपळूण संगमेश्वर तालुक्यासह काही ठिकाणी बरसला .

रत्नागिरी, (प्रतिनिधी) रत्नागिरी शहरात आज सायंकाळी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. सलग दुसर्‍या दिवशी पावसाचे आगमन झाले. नैऋत्य मौसमी पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे रत्नागिरी शहरात विक्रीसाठी आलेल्या छोटया विक्रेत्यांची तारांंबळ उडाली. उद्या दसरा सण असल्याने नागरिक देखील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आले होते. त्यामुळे पावसाने जनजीवन विस्कळीत केले. आज पडलेला पाऊस शेतीसाठी पुरक असल्याचे बोलले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने उकाडा, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीने नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारा उकाडा आणि पावसाअभावी कोमेजणारी पिके, अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात शनिवारी रात्री चिपळूण आणि संगमेश्वर ,लांजा ,राजापूर तालुक्यांत परतीच्या पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने सर्वदूर दिलासा मिळालेला नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg