loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुका पथनाट्य स्पर्धेत प्राथमिक शाळा देवळे नं.१ चा द्वितीय क्रमांक

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धेमध्ये पूर्ण प्राथमिक शाळा देवळे नंबर १ या शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला. सेवा संकल्प अभियान अंतर्गत ए. ए.पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धा दि.१२ ऑक्टोबर २६ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत तालुक्यातील आठ संघानी आपला सहभाग नोंदवला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवळे नंबर १ ही शाळा सुद्धा या स्पर्धेतील एक स्पर्धक होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पाठांतर, समय सूचकता, कल्पकता, शब्दांची अचूक फेक या सर्वांचा उपयोग करून 'महिला सक्षमीकरण काळाची गरज' या विषयावर पथनाट्य सादर केले. या स्पर्धेत शाळा देवळे नंबर एक ने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

टाईम्स स्पेशल

बक्षीस वितरण समारंभ तालुका शिक्षणाधिकारी परीट यांच्या शुभहस्ते विस्तार अधिकारी नाईक व बळवंतराव यांच्या उपस्थिती झाला. केंद्र समन्वयक शेख ही उपस्थित होते. त्यांनी आवर्जून शाळेचे अभिनंदन केले. या यशाबद्दल ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य, पालक या सर्वांनी शाळेच्या यशाचे भरभरून कौतुक केले व शाळेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg