मालवण (प्रतिनिधी)धृतराष्ट्राप्रमाणे वैभव नाईकांची अवस्था झाली आहे. सर्वत्र अंधार अशी स्थिती आहे. दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व जनतेच्या मदतीसाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात प्रशासन गतिमान असल्याने व जनता आमदार निलेश राणे यांच्या सोबत असल्याने नाईक सैरभर झालेत. प्रशासन स्तरावर काही बैठकांच्या तारीख बदलल्या त्याचा बाऊ करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या नाईकांनी 10 वर्षातील स्वतःचे अपयशी योगदान आधी तपासावे. प्रसिद्धीसाठी भुंकत राहाणे व अज्ञान पाजळणे हेच एकमेव काम वैभव नाईकांना उरले आहे, असा घणाघात करत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे.
दत्ता सामंत म्हणाले, नाईक तुमच्या 10 वर्षे अपयशी काळात विकास ठप्प झाला. मतदारसंघ मागे गेला. समस्यांचे डोंगर निर्माण झाले. या काळात आमसभा घेणेही शक्य झाले नाही. मात्र आमदार निलेश राणे यांच्या दीड वर्षाच्याच कार्यकाळात गतिमान रित्या विकास सुरू आहे. एकाच वर्षात दोन तालुक्याच्या आमसभा त्यांनी घेतल्या. मागील दहा वर्षाच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त शेकडो कोटी निधी आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात आणला. सर्वच ठिकाणी जनतेचा मोठा पाठिंबा आमदार निलेश राणे यांना मिळत आहे. आताही दुष्काळ स्थितीत आमदार निलेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेत आहेत. सरसकट पंचनामे गतिमान रित्या झाले पाहिजेत असे आदेश प्रशासनाला देऊन गतिमान कार्यवाही केली जात आहे. पाणीटंचाई दृष्टीने उपाययोजना सुरु आहेत. हक्काचं आमदार म्हणून आमदार निलेश राणे यांना जनतेतून मिळणारा पाठिंबा पाहून वैभव नाईक यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांची सुरू असलेली फडफड ही जसा दिवा शेवटच्या वेळी फडफडतो तशीच काहीशी राजकारणात झाली आहे. समोर अंधारमय भवितव्य दिसत असल्याने केवळ भुंकत राहणे व अज्ञान प्रकट करणे हेच एकमेव काम सुरू आहे.


















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.