loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाच्या पाण्याने भिजलेला गुरांच्या वैरणीचा भाताचा पेंढा सुकवण्यासाठीची वावघर भागणेवाडीतील शेतकऱ्यांची लगभग

दापोली (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे दापोली तालुक्यातील वावघर भागणेवाडी येथील शेतक-यांनी भाताच्या शेतात कापून ठेवलेला भाताचा पेंढा भिजला. पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांची हा ओला पेंढा सुकवण्याची आणि गुरांची वैरण वाचवण्याची मोठी लगबग सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील वावघर भागणेवाडी येथील शेतकऱ्यांना वैरण (चारा) टंचाईची भीती वाटत आहे. कापणीला आलेले भातपीक आणि कापून ठेवलेले भारे पावसाच्या पाण्यात भिजल्याने भातासोबतच गुरांच्या वर्षभराच्या चाऱ्याचे (पेंढ्याचे) मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील अनेक भागांत पेंढा काळा पडून कुजण्याची भीती निर्माण झाल्याने पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. सध्या वातावरणात कोरडेपणा व ऊन पडू लागल्याने शेतकरी कुटुंबासह शेतात उतरले आहेत. भिजलेले भाताचे भारे उन्हात पसरवून पेंढा सुकवणे, झोडणी करणे आणि सुकलेला पेंढा सुरक्षित ठिकाणी (उडव्या रचून) साठवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

पावसामुळे ओल्या पेंढ्याला बुरशी लागल्यास जनावरे तो चारा खात नाहीत. त्यामुळे भाताच्या उत्पादनासोबतच चाऱ्यासाठीही शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा दुहेरी फटका बसला आहे. दापोली तालुक्यातील बाधित भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करून पीक व चाऱ्याच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg