loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी बसस्टँडवर १२ तोळे सोन्याचे दागिने चोरणारी महिला जालन्यातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कामगिरी

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी बसस्टँड येथून तब्बल १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या महिला चोरट्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. संगीता सुभाष जाधव (वय ३५, रा. संग्राम हॉटेलच्या मागे, झोपडपट्टी, मंठा, जिल्हा जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित महिला आरोपीचे नाव आहे. ​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी बसस्टँड परिसरातून १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीएमटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. तपासादरम्यान हा गुन्हा अभिलेखावरील गुन्हेगार संगीता जाधव हिनेच केल्याचे निष्पन्न झाले. ​त्यानंतर एलसीबी सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने जालना जिल्ह्यातील मंठा येथे संयुक्त कारवाई करत २९ सप्टेंबर रोजी सापळा रचून आरोपी महिलेस शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित महिलेला पुढील कारवाईसाठी सावंतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून तिच्याकडून चोरी गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

ही कामगिरी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार जॅकसन घोन्सालविस, पोलीस अंमलदार अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, उपनिरीक्षक अविनाश पाटील, हवालदार शिंदे आणि महिला पोलीस अंमलदार गावकर यांच्या पथकाने भाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg