loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सहजीवन शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक मागदर्शन

खेड - भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लक्ष्मी इंडस्ट्रीज भरणे नाका येथे श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी भेट घेऊन व्यवसायाबाबत खेड मधील नामांकित उद्योजक लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक व सहजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त विलास बुटाला यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सत्यवान धोत्रे, पर्यवेक्षक उत्तम कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात होते. सदर वेळी उपस्थित शिक्षिका व विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, शिक्षक स्वप्निल वनारे, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg