loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीनजीकच्या कोळंबे गावी पर्‍यामधील डोहात बुडून दोघा मुलांचा मृत्यू

रत्नागिरी, 8 ऑक्टोबर (वार्ताहर) ः रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील पर्‍यामधील डोहात बुडून कल्याणमधील 2 मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी, 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. मंबईहून क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी आलेल्या टीममधील हे दोन खेळाडू आहेत. स्थानिक लोकानी येथील डोहात जाण्यास बंदी घातली आहे. त्या डोहामधील पाण्याचा अंदाज न आल्याने उडी मारल्यानंतर दगडावर आदळून ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज स्थानिकांनी बांधला आहे. पूर्णगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सौरव पवनकुमार झा (वय-16) आणि शुभम रमेश यादव (वय-16, रा. कल्यार्ण) अशी मृत मुलांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. कोळंबे येथे गेल्या 3 दिवसांपासून 16 वर्षाखालील मुलांचे क्रिकेट सामने आहेत. यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे 20 जण ही स्पर्धा खेळण्यासाठी आले आहेत. गुरूवारी दुपारी या टीमचा सामना संपल्यानंतर त्यापैकी सौरभ आणि शुभम हे दोघे क्रिकेट मैदानाच्या बाजूलाच असलेल्या पर्‍यात पोहण्यासाठी गेले. मुळात हा डोह अतिशय धोकादायक आणि जंगलात असल्याने स्थानिकांनी त्याठिकाणी पोहण्यास जावू नये अशा सावधानतेच्या सुचना देणारे फलक लावले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून या दोन्ही मुलांना डोहामध्ये पोहण्याचा मोह आवरला नाही. अन्य सहकार्‍यांबरोबर ते त्या डोहाकडे गेले आणि त्यांनी त्या डोहामध्ये उडी मारली ते वर आलेच नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे सहकारी मुले प्रचंड घाबरली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर स्थानिक काही लोक आले. त्या मुलांना बाहेर काढण्यास काही कालावधी गेला. जेव्हा मुलांना बाहेर काढले तेव्हा त्यांच्या चेहर्‍याला जखमा असल्याचे दिसून आले. त्यावरून ते उडी मारल्यानंतर दगडावर आदळुन त्यांना मृत्यू झालाच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. याची माहिती पूर्णगड पोलिसांना दिल्यानंतर काही वेळेतच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg