loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसफलकावर म्हसळा स्थानकाचे नाव गायब; प्रवाशांमध्ये नाराजी

म्हसळा : श्रीवर्धन आगारातून धावणाऱ्या काही एसटी बसच्या नामफलकावर ‘म्हसळा’ स्थानकाचे नाव नमूद नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. म्हसळा हे श्रीवर्धनकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असतानाही बसच्या फलकावर त्याचा उल्लेख नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना बस नेमकी कुठे थांबणार, याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बसच्या नामफलकावर मार्गावरील प्रमुख स्थानकांची नावे स्पष्टपणे नमूद करावीत, तसेच म्हसळा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने स्थानकाचे नाव ठळकपणे दर्शवावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन बसच्या नामफलकांमध्ये आवश्यक सुधारणा करावी, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg