loader
Breaking News
Breaking News
Foto

आम आदमी पार्टीची मागणी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तात्काळ निवारा शेड उभारा

रत्नागिरी (जमीर खलफे) : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय थांबवण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात सुरक्षित व तात्पुरत्या निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना थेट निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य केंद्र असल्याने ग्रामीण, डोंगरी आणि दुर्गम भागातून दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. अनेकदा रुग्णांवर तातडीने किंवा दीर्घकाळ उपचार सुरू असताना त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या आवारातच मुक्काम करावा लागतो. मात्र, योग्य निवाऱ्याची सोय नसल्यामुळे उन्हा-पावसात, विशेषतः रात्रीच्या वेळी नातेवाईकांना उघड्यावर किंवा व्हरांड्यात बसून रात्र काढावी लागते. यामुळे महिला, वृद्ध आणि बालकांना मोठ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

टाईम्स स्पेशल

​ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आम आदमी पार्टीने पुढाकार घेत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रुग्णांच्या सोबत्यांना सुरक्षित आणि सावली मिळण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात एक तात्पुरती पण सर्वसोयींनी युक्त निवारा शेड उभारावी, जेणेकरून दूरवरून आलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ​हे निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक व जनसंपर्क प्रमुख झिया अहमद मुल्ला तसेच तालुका सचिव हरेश गुरव यांनी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुपूर्द केले. या रास्त मागणीवर रुग्णालयाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर निवारा शेडचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg