loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली भाजप तर्फे कांगवई गावात आदिवासी बांधवांसोबत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

दापोली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, दापोली तालुका यांच्या वतीने कांगवई गावात स्थानिक आदिवासी बांधवांच्या सोबतीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 'जनजातीय गौरव दिवस' म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, त्यांनी आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि हक्कांसाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून दिली. तसेच, गावातील आदिवासी बांधवांचा यथोचित सन्मान करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजप नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम ऊर्फ भाऊ इदाते, भाजपा दापोली तालुका अध्यक्षा व नगरसेविका जया साळवी, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे आदी दापोली भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कांगवई येथील आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg