loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल येथील गणेश विद्या मंदिरच्या नव्या इमारतीचा उद्या भूमिपूजन सोहळा; पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती लाभणार

राजापूर / तुषार पाचलकर : तालुक्यातील पाचल येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद गणेश विद्या मंदिर आदर्श शाळा, पाचल नं. ५ या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजता शाळेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाचल परिसरातील शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य समीक्षा वाफेकर व अपेक्षा मासये, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव तसेच युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

टाइम्स स्पेशल

या भूमिपूजन सोहळ्याला पाचलसह परिसरातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व श्री महागणपती उत्सव मंडळ, पाचल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg