loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाअभावी धोक्यात आलेल्या भातशेती पिकाची दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी शेताच्या बांधावर जाऊन केली पाहणी

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यात पावसाच्या खंडामुळे भात शेती धोक्यात आली असून दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी आपल्या महसूल अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सोबत घेऊन असोंड महसुली गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे. यावेळी तहसीलदार अर्चना बोंबे घोलप यांच्या समवेत मंडल निरीक्षक क्षिरसागर, तलाठी शिर्के, माजी पोलीस पाटील कमलाकर आंग्रे, ऊर्फी गावातील प्रगतिशील शेतकरी अनंत काटकर, असोंड ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच दिपक देवरुखकर, शेतकरी दिपक लाड, हरिश्चंद्र तूरे आदींसह असोंड येथील स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावा तसा आणि शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडलाच नाही त्यामुळे भात पिके सुकू लागली आहेत आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी महसूल प्रशासन थेट मैदानात उतरले आहे. दापोली तालुक्यातील असोंड येथील थेट शेताच्या बांधावर जाऊन दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी स्वतः जातीने सुकत चाललेल्या भात पिकांची आणि जमिनीतील ओलाव्याची पाहणी केली.

टाईम्स स्पेशल

या दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.पावसाअभावी झालेल्या शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांना देण्यात आले आहेत. जेणेकरून बाधित शेतकर्‍यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देता येईल. तहसीलदार अर्चना बोंबे घोलप यांच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे दापोली तालुक्यातील शेतकर्‍यांकडून प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg