अलिबाग (वार्ताहर) - अलिबागच्या ऐश्वर्या बोराडे हिने आपल्या ज्ञानाच्या, कल्पकतेच्या आणि सर्जनशीलतेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॅनडामध्ये स्थायिक असलेली ऐश्वर्या ही पेरेंटिंग आणि लाइफ स्टाईल कनेंट क्रिएटर म्हणून कार्यरत असून, तिच्या @mom.in.a.million या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि भारतातील एक लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत ती पोहोचली आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता मोबाइल वापर, पालकत्वातील आव्हाने, बालकांचा सर्वांगीण विकास आणि मातांचे मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे विषय बनले आहेत. ऐश्वर्या आपल्या कंटेंटच्या माध्यमातून या विषयांवर अत्यंत सोप्या, व्यावहारिक आणि सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करते.
लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि कुतूहल निर्माण व्हावे, यासाठी ती STEAM (Science, Technology, Engineering, Arts and Mathematics) या संकल्पनेवर आधारित विविध घरगुती उपक्रम पालकांसमोर मांडते. मोबाइल आणि स्क्रीनपासून मुलांना काही काळ दूर ठेवून खेळता-खेळता शिकण्याची संधी कशी निर्माण करता येईल, याबाबत ती विशेष मार्गदर्शन करते. ऐश्वर्याच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे. वॉलमार्ट, हिमलया यूएसये आणि Hatley यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत तिने ५० हून अधिक व्यावसायिक सहकार्य प्रकल्प केले आहेत.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे Breakfast Television (Rogers Sports & Media) आणि The Morning Show (Global News) यांसारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये तिला पालकत्व, मातांचे मानसिक आरोग्य आणि बालविकास या विषयांवर तज्ज्ञ म्हणून आपले विचार मांडण्याची संधी मिळाली आहे.सोशल मीडियाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता, त्यातून कुटुंबांना उपयुक्त माहिती, पालकांना आत्मविश्वास आणि मुलांना शिकण्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम ऐश्वर्या सातत्याने करत आहे.
ऐश्वर्याच्या या यशस्वी प्रवासामागे तिचे आई-वडील राजेंद्र बोराडे आणि आशा बोराडे यांचे संस्कार, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ महत्त्वाचे आहे. आपल्या मुलीने स्वतःच्या कर्तृत्वावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, विविध क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करावे, यासाठी त्यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले. तसेच तिचे पती महेश शिंदे यांची साथ, समजूतदारपणा आणि प्रोत्साहन हेही तिच्या वाटचालीतील महत्त्वाचे बळ आहे. तिची लाडकी मुलगी अहाना शिंदे हिच्या सहवासातून आणि मातृत्वाच्या अनुभवातूनही ऐश्वर्याला आपल्या कामासाठी नवनवीन प्रेरणा मिळत असते. अलिबागच्या बोराडे कुटुंबासाठी, शिंदे कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ऐश्वर्याची ही यशस्वी वाटचाल अभिमानाची बाब आहे.अलिबागच्या मातीतून रुजलेली आणि आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी ऐश्वर्या बोराडे ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी करणारी कन्या आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.