loader
Breaking News
Breaking News
Foto

वाभवे वैभववाडीत नगराध्यक्षांच्या उपस्थितीत सुख नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला

वैभववाडी (प्रतिनिधी) - वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने नगरपंचायतीच्या हद्दीतील कोंडवाडी येथे नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्या उपस्थितीत सुख नदीला वनराई बंधारा बांधण्यात आला. पालकमंत्री ना. नितेश राणे, व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीतील कोडवाडी येथील सुख नदीला वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात साठलेले पाणी वैभववाडी शहरासह कोंडवाडीसाठी उपयोगात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची नळ योजनेची विहीर याच नदीला लागून असल्याने या सुख नदीवरील बंधाऱ्यांचा उपयोग या विहिरीला होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीने कोंडवाडी येथील सुख नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संजय सावंत, शहर अध्यक्ष भाजपा शिवाजी राणे, आदी ग्रामस्त उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg