loader
Breaking News
Breaking News
Foto

ॲड. हरीश पाटील यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या नवी मुंबई अध्यक्षपदी निवड

नवी मुंबई : ॲड. हरीश मगन पाटील यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या नवी मुंबई अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सचिव तथा निवृत्त पोलीस अधिकारी आनंद जाधव यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर केली.मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष अभिजीत दरेकर आणि राष्ट्रीय रोजगार व उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ॲड. हरीश पाटील हे कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे वास्तव्यास असून, त्यांना गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाचा आणि सामाजिक कार्याचा अनुभव आहे. त्यांनी ग्रीनस्केप रॉयल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये सुमारे दीड वर्ष उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०२५ ते २०२६ या कालावधीत त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. या काळात त्यांनी सामाजिक उपक्रमांसह सोसायटीशी संबंधित विविध कामांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या कुटुंबाला राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा त्यांच्या मूळ गावी जापोरे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील पहिले सरपंच होते. त्यांचे काका सुमारे १५ वर्षे सरपंच राहिले असून, त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल यांच्याशीही त्यांच्या कुटुंबाचे संबंध असल्याचे पाटील यांनी सांगितले.नवी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, सामाजिक प्रश्नांवर काम करणे आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सहकारी आणि परिचितांकडून अभिनंदन केले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg