loader
Breaking News
Breaking News
Foto

सडवे ग्रामस्थांनी बंधारे बांधून दिवाळी पहाट केली साजरी

संगलट (इक्बाल जमादार) - नरक चतुर्दशीच्या दिवशी इतर मनोरंजनात्मक बाबींना महत्व न देता सडवे येथील सुमारे 50 ग्रामस्थांनी एकत्र येत भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून श्रमदानातून नदीवर विविध ठिकाणी बंधारे बांधून एकजुटीने दिवाळी पहाट साजरी केली. या अनोख्या व स्तुत्य उपक्रमामुळे सडवे ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या कोकणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सडवे येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा व्हावा, भूजलपातळीत वाढ व्हावी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कामासाठी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जयेंद्र कावणकर, सरपंच वसंत मेंगे, पोलीस पाटील रोशन पादड, गाव अध्यक्ष प्रकाश मेंगे, जितेंद्र मनवल, माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र कावणकर, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक पादड, ग्रामपंचायत सदस्य महेश वाळंज यांच्यासह गावातील अनेक युवक व ज्येष्ठ ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टाईम्स स्पेशल

सर्वांनी एकजुटीने श्रमदान करीत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. युवकांचा उत्साह आणि ज्येष्ठ ग्रामस्थांचे मार्गदर्शन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. गावाच्या विकासासाठी लोकसहभाग आणि सामूहिक श्रमदान किती महत्त्वाचे आहे, याचा आदर्श सडवे ग्रामस्थांनी या उपक्रमातून घालून दिला आहे. शासनाच्या विविध जलसंधारण योजनांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसमृद्ध गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते, हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg