loader
Breaking News
Breaking News
Foto

झाडगाव येथे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विविध व्याख्याने व नशामुक्ती प्रतिज्ञा संपन्न

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरीतर्फे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आज (दि. ३ ऑक्टोबर २०२६) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल संचलित श्री स्वामी विवेकानंद विद्यार्थी वसतिगृहात सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये: अन्नातील मासळीचे महत्त्व: डॉ. अपूर्वा सावंत यांनी आहारातील मासळीचे पोषणमूल्य आणि आरोग्यासाठी तिचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. मत्स्य व्यवसाय - करिअर मार्गदर्शन: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगावचे डॉ. सुशील कांबळे यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील रोजगाराच्या व करिअरच्या विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. नशामुक्त भारत - सशक्त भारत: प्रा. सचिन साटम यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत सशक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सचिन साटम यांनी उपस्थितांना ‘नशामुक्त भारता’ची सामूहिक प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमात वसतिगृहातील व शाळेतील ६७ विद्यार्थी तसेच शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. संजयकुमार तोरणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम यांनी केले, तर समन्वयाचे काम डॉ. अपूर्वा सावंत यांनी पाहिले. याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी, शुभांगी तापेकर तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. नरेंद्र चोगले उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. अपूर्वा सावंत, प्रा. सचिन साटम, डॉ. सुशील कांबळे, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील, वसतिगृह अधीक्षक गजानन बागडी, शिक्षक स्वप्नील सावंत, गौरी शितुत, तेजस्विनी करंबेळकर तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg