खेड : मुंबई युवा महोत्सवात सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेची आणि कलात्मक प्रतिभेची चमक दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयाने मराठी कथाकथन स्पर्धेत रौप्यपदक, तर तालवाद्य (पखवाज) प्रकारात कास्यपदक पटकावत पदकांची दुहेरी कमाई केली. महाविद्यालयाच्या एम.एस्सी. संगणकशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या आदित्य मोहिते याने मराठी कथाकथन स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत विद्यापीठ स्तरावर रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे आदित्यने यापूर्वीही कथाकथन स्पर्धेत रौप्यपदक मिळवून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची मोहोर उमटवली आहे.
याचबरोबर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागातील विद्यार्थी ऋषिकेश देवरुखकर याने तालवाद्य (पखवाज) या प्रकारात दमदार सादरीकरण करत कास्यपदक मिळवले. त्याच्या या यशाने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ग्रंथपाल तसेच मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव, उत्तर विभाग रत्नागिरीचे सहसमन्वयक डॉ. राजेश राजम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी आणि सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. अमोल पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदित्य मोहिते व ऋषिकेश देवरुखकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.