loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबणीतील तरुणाची ट्रकमध्ये आत्महत्या

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी हद्दीत उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये किशोर रमेश कुराडे (२८ रा. कळंबणी-हंबीरवाडी, खेड) गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. महामार्गाच्या कडेला ट्रक एकाच ठिकाणी बराच वेळ उभा असल्याने स्थानिकांचे लक्ष गेले. ते तेथे गेले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ट्रकमधील केबिनमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ याची माहिती येथील पोलिसांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक अहिरे व पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg